
जिल्हा परिषद शाळा विजयनगर हि शाळा महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आहे.डोंगराच्या कुशीत वसलेली हि शाळा अत्यंत दुर्गम भागात आहे.शाळेच्या चारही बाजूला काटेरी कुंपण केलेले आहे.मैदानात भरपूर झाडे लावलेली आहे. मुलांना खेडण्यासाठी मोठे मैदान आहे. सर्व भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहे. शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे वर्ग आहेत .तीन शिक्षक कार्यरत आहेत . मुख्याध्यापक श्री दिलवरसिंग कोटया वसावे .उपशिक्षक श्री संभाजी पुंडलिक अहिरे आणि उपशिक्षिका श्रीमती तुळसा गजमल चौरे. शाळेत आदर्श निर्माण करण्यासाठी तिन्ही शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवतात . मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून परिपाठात बोधकाथांचा समावेस केला जातो.परिपाठाच्या वेळी मराठी,हिंदी,इंग्रजी प्रतिज्ञा म्हणून समाजात एक वेगळेपण जोपासले आहे.शिक्षणही गुणवत्तापूर्ण दिले जाते. गुणवत्तेच्या जोरावर इथले चौथी पास झालेले विद्यार्थी इयत्ता पाचवीत सेमी इंग्लिशला जातात .खेळाच्या संदर्भात शाळेचे विद्यार्थी राष्टीय पातळीला जाऊन दुसरा क्रमांक मिळवितात .अशा सर्व बाबतीत शाल नंबर वन आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा