आमची शाळा जिल्हा परिषद शाळा विजयनगर ता. साक्री जि. धुळे.आज शाळेत गेल्यावर मनात विचार आला कि झाडे लावावे .कारण पाऊस बऱ्यापैकी झालेला होता . शाळेतील निवडक मुलांना घेऊन मी जंगलाच्या दिशेने रोपे आणण्यासाठी निघालो. जंगल तसे जवळच होते .रस्त्यात गमती जमती आम्ही चाललो होतो. या उद्देशाने मी त्यांना एकेक अनुभव देत होतो. त्यांच्या कडून मी विविध वनस्पतीची माहिती कडून घेतली . मुले वनस्पतीची माहिती उत्साहाने सांगत होते. गप्पा मारता मारता आम्ही जंगलाच्या अगदी जवळ गेलो. तो पर्यंत मी मुलांना सांगितले नाही कि आपण रोप घ्यायला आलो आहोत. थोडे पुढे गेल्यावर झाडाच्या खाली उगवलेली रोप मी त्यांना काढायला लावली. त्यानंतर मुलांना समजले कि आपण रोप घ्यायला आलो आहोत .म्हणून ते मोठ्या झाडांच्या खाली जाऊन रोप काढायला लागली. बघता बघता मुलांनी भरपूर रोपे जमवली. त्यानंतर मी मुलांना शाळे कडे निघायला सांगितले. शाळेत आल्यानंतर गावातील लोकांना बोलवून शिक्षकांनी झाडे लावायला सुरवात केली.
लोकांनी ,शिक्षकांनी, आणि मुलांनी वृक्ष रोपण केले. या कार्य क्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलवरसिंग कोटया वसावे ,उप शिक्षक श्री संभाजी पुंडलिक अहिरे ,उप शिक्षिका श्रीमती तुळसा गजमल चौरे ,उपसरपंच
श्री वसंत बारीश आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा