सोमवार, २५ जुलै, २०११

जिल्हा परिषद शाळा विजयनगर

जिल्हा परिषद शाळा विजयनगर  हि शाळा महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आहे.डोंगराच्या कुशीत वसलेली हि शाळा अत्यंत दुर्गम भागात आहे.शाळेच्या चारही बाजूला काटेरी कुंपण केलेले आहे.मैदानात भरपूर झाडे लावलेली आहे. मुलांना खेडण्यासाठी मोठे मैदान आहे. सर्व भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहे. शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे वर्ग आहेत .तीन शिक्षक कार्यरत आहेत . मुख्याध्यापक श्री दिलवरसिंग कोटया वसावे  .उपशिक्षक श्री संभाजी पुंडलिक अहिरे आणि उपशिक्षिका श्रीमती तुळसा गजमल चौरे. शाळेत आदर्श निर्माण करण्यासाठी तिन्ही शिक्षक वेगवेगळे उपक्रम  राबवतात . मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून परिपाठात बोधकाथांचा समावेस केला जातो.परिपाठाच्या वेळी मराठी,हिंदी,इंग्रजी प्रतिज्ञा म्हणून समाजात एक वेगळेपण जोपासले आहे.शिक्षणही गुणवत्तापूर्ण दिले जाते. गुणवत्तेच्या जोरावर इथले चौथी पास  झालेले विद्यार्थी इयत्ता पाचवीत सेमी इंग्लिशला जातात .खेळाच्या संदर्भात शाळेचे विद्यार्थी राष्टीय पातळीला जाऊन दुसरा क्रमांक मिळवितात .अशा सर्व बाबतीत शाल नंबर वन आहे.

वृक्षारोपण












आमची शाळा जिल्हा परिषद शाळा विजयनगर  ता. साक्री जि. धुळे.आज शाळेत गेल्यावर मनात विचार आला कि झाडे लावावे  .कारण पाऊस  बऱ्यापैकी झालेला होता . शाळेतील निवडक मुलांना घेऊन मी जंगलाच्या दिशेने रोपे आणण्यासाठी निघालो. जंगल तसे जवळच होते .रस्त्यात गमती जमती आम्ही चाललो होतो. या उद्देशाने मी त्यांना एकेक अनुभव  देत होतो. त्यांच्या कडून मी विविध वनस्पतीची माहिती कडून घेतली . मुले वनस्पतीची माहिती उत्साहाने सांगत होते. गप्पा मारता मारता आम्ही जंगलाच्या अगदी जवळ गेलो. तो पर्यंत मी मुलांना सांगितले नाही कि आपण रोप घ्यायला आलो आहोत. थोडे पुढे गेल्यावर झाडाच्या खाली उगवलेली रोप मी त्यांना काढायला लावली. त्यानंतर मुलांना समजले कि आपण रोप घ्यायला आलो आहोत .म्हणून  ते मोठ्या झाडांच्या खाली जाऊन रोप काढायला लागली.  बघता  बघता मुलांनी भरपूर रोपे जमवली. त्यानंतर मी मुलांना शाळे कडे निघायला सांगितले.  शाळेत आल्यानंतर गावातील लोकांना बोलवून शिक्षकांनी झाडे लावायला सुरवात केली. 


लोकांनी ,शिक्षकांनी, आणि मुलांनी वृक्ष रोपण केले. या कार्य क्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलवरसिंग कोटया वसावे ,उप शिक्षक श्री संभाजी पुंडलिक  अहिरे ,उप शिक्षिका श्रीमती तुळसा गजमल चौरे  ,उपसरपंच
श्री वसंत बारीश  आणि ग्रामस्थ उपस्थित होते.